Site icon ताज्या बातम्या

Vande Bharat Express | रेल्वे प्रवास आता अजून वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार! #1 Super Fast Train

Vande Bharat Express | आता वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी सुविधांसह धावणार !

Vande Bharat Express: मेक इन इंडिया  (Make in India) अंतर्गत आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत बनवल्या जाणाऱ्या आगामी वंदे भारत रेल्वेमध्ये अत्याधुनिक आरामदायी सुविधांसह वेगवान वेग आणि सुरक्षितता देखील वाढवली गेली आहे. या गाडीत एकुण 16 कोच असतील आणि 823 स्लीपर बर्थ ची सुविधा मिळणारं आहे. त्याच बरोबर अकरा 3AC कोच, चार 2AC कोच आणि एक 1 AC कोच असतील.

Vande Bharat एक्सप्रेस गाडीमध्ये एकुण 611 3 tier-एसी त्याच बरोबर 188 2 tier-एसी आणि 24 1 Tier AC क्लास बर्थ असतील. आगामी वंदे भारत ट्रेन ही युरोपीय गुणवत्ता मानांकनानुसार जागतिक दर्जाची बनवण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये मॉड्युलर Design टॉयलेट, मॉड्युलर पॅन्ट्री coach, LCD, LED डिस्प्ले पॅनल आणि सुरक्षा कॅमेरे CCTV देखील दिले गेलेले आहेत. कोचमध्ये अविरत शुद्ध हवा प्रवाहित राहण्यासाठी ‘फोटो कॅटेलिटिक अल्ट्रा व्हायलेट एअर प्युरिफिकेशन प्रणाली’ बसविण्यात आली असल्याने हा प्रवास अतिशय अरामदायी होणार आहे.

“वन्दे भारत” ट्रेन धावणार 180 किलोमीटर प्रति तास च्या वेगाने !

Vande Bharat Express ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे आणि तिचा कमाल वेग 180 किलोमीटर प्रति तास असणार आहे. नवीन आगामी वंदे भारत ट्रेन ही जवळपास 180 किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने धावणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत बनवल्या गेलेल्या आगामी वंदे भारत च्या सुविधां सोबतच या रेल्वेच्या परफॉर्मन्स देखील उल्लेखनीय आणि दर्जेदार असणार आहे. जुन्या वंदे भारत ट्रेनचा ताशी वेग 120 ते 130 प्रति तास असा आहे.

ह्याच बरोबर भारतातील काही प्रमुख आणि लांबचा टप्पा गाठणाऱ्या रेल्वे प्रमुखता राजधानी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, पंजाब मेल, वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांच्या वेगापेक्षा आगामी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचा वेग निश्चितच जास्त असणार आहे. कमीत कमी स्टॉप घेऊन कमी वेळेत जास्त अंतर गाठण्यासाठी प्रवाशांना या आगामी वंदे भारत एक्सप्रेसचा निश्चितच फायदा होईल असे दिसत आहे.

भारतातील या प्रमुख शहरात धावणार पहिली नवीन “वंदे भारत” ट्रेन !

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत Vande Bharat Express ट्रेनची सुरुवात केली होती. शंभरहून अधिक वंदे भारत ट्रेन सध्या भारतात विविध शहरातून धावत आहेत. तसेच आगामी वंदे भारत ट्रेनचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांसोबत नवीन वंदे भारत सध्या 3 ट्रेन मेरठ सिटी ते लखनऊ, मदुराई ते बंगरूळ आणि चेन्नई एगमोर ते नागरकोईल या शहरांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर सुद्धा लवकरच अत्याधुनिक नवीन वंदे भारत ट्रेन धावताना दिसणार आहे.

नविन आकर्षक सोयी-सुविधां सह धावणार “वंदे भारत” !

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिशन द्वारे सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनचा दुसरा पर्व लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी शंभराहून अधिक वंदे भारत रेल्वे भारतीय लोहमार्गावर विविध शहरांमध्ये धावताना दिसत आहे.

तिकिटे बुक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा: https://www.irctc.co.in/nget/train-search

पूर्वीच्या वंदे भारत Express मध्ये सेमी ऍडजेस्टेबल सीट होत्या ज्यामध्ये प्रवासी फक्त बसून प्रवास करू शकत होते. परंतु आता नवीन वंदे भारत रेल्वेमध्ये झोपण्याची सुविधा मिळणार आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोज वरून आपल्याला दिसत आहे की नवीन वंदे भारत Express निश्चितच प्रवाशांचे आकर्षण ठरेल. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत देशातील पहिली ‘वंदे भारत – स्लिपर’ कोच सहित लवकरच भारतातील प्रमुख शहरांमध्ये धावणार आहे.

बाथरूम मध्ये मिळणार अंघोळीसाठी गरम पाणी ?

नवीन वंदे भारत Vande Bharat Express ट्रेनमध्ये आकर्षक सुविधा सोबतच वॉशरूम सुविधा देखील अपग्रेड करण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. लांबच्या प्रवाशांसाठी ही सुविधा निश्चितच उपयुक्त ठरेल. फर्स्ट क्लास एसी कोचेसमधील प्रवाशांसाठी गरम पाण्याच्या शॉवरचीही व्यवस्था आहे. या गाडीतत सेन्सर-आधारित लाइटिंग, इंटरकम्युनिकेशन डोअर्स आणि नॉइज इन्सुलेशन असेल. यात दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि स्वच्छतागृहे असतील.

आता भगव्या रंगात दिसणार आधुनिक वंदे भारत एक्सप्रेस !

अत्याधुनिक सोयी-सुविधांसह आगामी वंदे भारत एक्सप्रेस Vande Bharat Express ही भगव्या रंगात दिसेल असे सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या अनावरण सोहळ्यात भारतीय प्रवाशांसमोर आधुनिक वंदे भारत चित्र समोर आले आहे. सध्या ह्या ट्रेनची चाचणी सुरू आहे लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी ही ट्रेन सुरू होणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम भारत याकडे भारताची वाटचाल !

शनिवारी झालेल्या उद्घटना प्रसंगी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत भारतातील पहिल्या तीन स्लीपर वंदे भारत रेल्वे ना हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी आणि रेल्वेमंत्र्यांसोबत संवाद साधला. त्यात त्यांनी सांगितले की, आपला भारत आधुनिक तंत्रज्ञान आणि विकसित भारत याकडे पाऊल ठेवत आहे. आपल्या देशाचे दळणवळण अधिक गतिमान होण्यासाठी हा रेल्वेचा उपक्रम आम्ही राबवत आहोत याचा निश्चितच दैनंदिन वाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी प्रवाशांना आणि भारतीय नागरिकांना याचा लाभ होईल यात शंका नाही.

१० दिवसांच्या चाचणी नंतर धावणार नविन वंदे भारत !

बेंगलोर येथे रेल्वे कारखान्यात बनवण्यात आलेल्या आधुनिक वंदे भारत संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बी एम एल ह्या कारखान्यात वंदे भारत एक्सप्रेस साठी वापरल्या जाणाऱ्या स्लीपर कोचच्या नमुनांचे अनावरण करून त्याच्याबद्दल माहिती दिली. नवीन वंदे भारत एक्सप्रेस ही प्रवाशांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे तात्पूर्वी या ट्रेनची बारकाईने आणि चोख तपासणी होणार आहे. पत्रकारांशी संवाद साधताना वैष्णव म्हणाला की येत्या दोन ते तीन महिन्यात भारतीय रेल्वे रूळावर नवीन वंदे भारत धावताना दिसेल.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Tata Curvv Petrol & Diesel Launched

Tata Curvv | फक्त ₹ 9.89 लाख !!! Price Revealed | Most Affordable Car

Exit mobile version