Site icon ताज्या बातम्या

Raj Thackeray | राज ठाकरे यांनी 28 ऑगस्ट रोजी बदलापूरला भेट देऊन…. Raj Thackeray Extremely Angry on ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बदलापूरला भेट दिली !

बदलापूर: दिनांक 28 ऑगस्ट रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बदलापूर ला येऊन भेट दिली. ह्या दरम्यान त्यांनी पिडीत कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. त्याच बरोबर ज्या लोकांवर पोलिस प्रशासना कडून गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्याशी ही संवाद साधला.

काय म्हणाले राज ठाकरे (Raj Thackeray) !

बदलापूरची दुर्दैवी घटना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर आणि महिला सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ही घटनाउघडकीस आणली, त्या दुर्दैवी पालकांच्या कुटुंबियांना आधार दिला. या घटनेच्या आसपास मी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान विदर्भात होतो. यामुळे महाराष्ट्र सैनिकांशी आणि इतरांशी फोनवर संवाद साधला. आज मात्र बदलापूरला जाऊन, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांशी, तिथल्या स्थानिकांची जाऊन भेट घेतली.

पोलिस प्रशासनाचा हलगर्जी पणा खपवून घेतला जाणार नाही !

Video credit: @maharashtratimes

राज ठाकरे Raj Thackeray यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बदलापूरची घटना, त्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने पोलीस अधिकारी महिला असून देखील त्यांना त्या मुलींची व्यथा समजू नये? दाखवलेला हलगर्जीपणा, बेफिकिरी इतकी टोकाची होती की लोकांचा राग अनावर होणं, त्यातून निदर्शनं होणं हे स्वाभाविकच होतं. अशा उद्रेकानंतर परिस्थिती ही नरमाईने हाताळायची असते. पण इथे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेलेत. लोकांच्या मागे ससेमिरा लावला गेला आहे. हे चुकीचे आहे. असं होता कामा नये.

पण शेवटी पोलिसांवर पण कुठून ना कुठून येणारा ताण, राजकीय हस्तक्षेप !

पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणावर राज साहेब (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. पीडित मुलीचे कुटुंब जेव्हा एफ आय आर FIR नोंदायला ला आले होते त्यावेळी महिला पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा का दाखल नाही केला यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या महिला पोलिस अधीक्षकाची ची बदली देखील झाली. यावरून हे दिसत आहे की या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर राजकीय लोकांचं दबाव टाकण्यात आला आहे. त्यामुळे मी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून, आंदोलकांना त्रास न देण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला.

मी नेहमी म्हणतो तसं की महाराष्ट्रातील पोलिसांवर इतका ताण असताना पण ते ज्या पद्धतीने राज्य हाताळतात ते वाखणण्या जोगं आहे. पण शेवटी पोलिसांवर पण कुठून कुठून येणारा ताण, राजकीय हस्तक्षेप याचा त्यांना कायम त्रास देत असतो. तस इथेही राजकीय हस्तक्षेप आहे असं मला जाणवतंय, याबद्दल मी सरकारशी बोलणार आहे असे ही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

स्त्रिया सुरक्षित राहतील हे पाहिलं तर अशा प्रकारची निदर्शनंच होणार नाहीत.!

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुढे संवाद साधतांना म्हणाले की, सामान्यांना वेठीस धरण्याच्या ऐवजी, राज्यातील स्त्रिया सुरक्षित राहतील हे पाहिलं तर अशा प्रकारची निदर्शनंच होणार नाहीत. त्यामुळे सरकारने आपलं प्रथम कर्तव्य या घटना होऊ न देणे, गुन्हेगारांना शासन करणे हे विसरू नये. आणि मागे मी म्हणलं तसं महाराष्ट्र सैनिकांनी या घटनेत जशी सतर्कता दाखवली तशी यापुढे पण कायम दाखवावी. आणि गरज पडली तर अशा घाणेरड्या प्रवृत्तींना हात सोडून कसा धडा शिकवायचा हे तुम्हाला माहीतच आहे. असे ही राज ठाकरे Raj Thackeray म्हणाले.

विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी साधला निशाणा !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच बदलापूर येथे भेट दिली. यादरम्यान त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना भेट देऊन पीडित कुटुंब आणि सामान्य नागरिकांचे शी संवाद साधला. यावेळी राज साहेबांनी कुठल्याही पत्रकारांना सभागृहाच्या देण्याची परवानगी दिली नाही. यावरून विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर राज ठाकरे यांना ट्रोल करायचा प्रयत्न केला. येत्या विधानसभा निवडणुकी साठी राजकारण आणि राजकीय नेते तसेच त्यांचे कार्यकर्ते हे जोरात कार्यरत आहे. राज ठाकरेंच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्व विधानावरून विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Olympic Games | 2016 च्या रिओ ऑलम्पिकला Maria Andrejczyk चं पदक अवघ्या २ सेंटीमीटरने हुकलं!

Olympic Games | 2016 च्या रिओ ऑलम्पिकला Maria Andrejczyk चं पदक अवघ्या २ सेंटीमीटरने हुकलं!

Exit mobile version