Site icon ताज्या बातम्या

Paris Olympics 2024 | भारताने चौथ्या दिवशी देखील मारली बाजी! | India’s Pride मनु भाकर & सरबज्योत सिंग |

6

Paris Olympics 2024 | भारताने चौथ्या दिवशी देखील मारली बाजी!

Paris Olympics 2024 मध्ये चौथ्या दिवशी देखील भारताने बाजी मारली आहे मनु भाकर आणि सरबज्योत सिंग या दोघींना कांस्यपदक मिळाले आहे. या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल (Mix) नेमबाजी स्पर्धेत हे पदक जिंकले आहे. ह्या जोडीने साउथ कोरियन खेळाडू Lee Wonho आणि Oh Ye Jin यांना 16-10 या फरकाने हरवले आहे. मनु भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी एक नवा इतिहास रचला आहे. भारताच्या इतिहास बघता मनू भाकर हिने एकाच ऑलम्पिक मध्ये दोन पदके जिंकली आहेत आणि ती भारताची पहिली खेळाडू बनली आहे.

Paris Olympics 2024 Wrestling यावेळी भारताला कुस्तीत आत्तापर्यंत निराशा हाती लागली आहे. त्याचबरोबर ऑलम्पिक मध्ये कुस्ती या खेळामध्ये भारताला अपयशाचा सामना करावा लागला आहे. या खेळामध्ये पुरुष गटात भारताचा अमित पंघल (51 किलो Rd of 16 ) तसेच महिला कुस्तीपटू जैस्मिन लांबोरिया (महिला 57 किलो -Rd ऑफ 32) आणि प्रीती पवार Preeti Panwar (महिला 54 किलो Rd of 16) यांन मध्ये पराभूत झाले आहे.

तिरंदाजी मध्ये भारताची वरचढ !

Video credit: Zee24 Taas

Paris Olympics 2024 मध्ये तिरंदाजीत भजन कौर महिलांच्या तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक फेरी मध्ये पुढच्या फेरीत म्हणजेच 16 व्या फेरीत प्रवेश केला आहे. तसेच Rowing (रोइंग) मध्ये भारताचा अष्टपैलू बलराज पनवर (Balraj Panwar, Indian rower) याने उपांत्यपूर्व फेरीत पाचवे स्थान पटकावले आहे.

Paris Olympics 2024 भारताच्या पुरुष हॉकी संघाला घवघवीत यश ! 

भारताच्या पुरुष हॉकी संघाला घवघवीत यश मिळाले आहे भारतीय हॉकी संघाने या फेरीत आयर्लंडचा (2-0) असा दमदार पराभव केला आहे. भारतीय हॉकी संघाचा युवा कर्णधार हरमनप्रीत कौर याच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे आपला भारतीय संघ यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे. ऑलम्पिक मध्ये भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत त्यात 2 सामन्यांमध्ये विजय आणि 1 सामना अनिर्णित झाला आहे. भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे त्यांना या वाटचालीत घवघवीत यश मिळावे म्हणून भारतीय उत्सुक आहेत.

याआधी भारताने न्यूझीलंड विरुद्ध आणि अर्जेंटिनाविरुद्ध सामना जिंकला आहे व आयर्लंड विरुद्धचा सामना अनिर्णित ठरला होता. आता पुढे भारतीय संघाला गत विजेते ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम विरुद्ध खूप ताकदीने खेळायचे आहे. कारण हे दोन्हीही संघ त्यांच्या उत्तम आणि दमदार परफॉर्मन्स मुळे इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. बेल्जियम संघाने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे आणि पॉइंट टेबलवर त्यांची संख्या नऊ अशी आहे.

Paris Olympics 2024 Men’s Hockey Group B काय आहे पॉइंट टेबल ?

Paris Olympics 2024 च्या मेन्स हॉकी ग्रुप बी च्या पॉइंट टेबल मध्ये बेल्जियम संघ सर्वात प्रथम स्थानावर येऊन पोहोचला आहे. तसेच आपला भारतीय संघ तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. सध्याच्या पॉइंट टेबल च्या स्थिती पाहता भारत सात पॉईंट घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया तीन सामने खेळून दोन विजय आणि एक पराभूत या नुसार तिसऱ्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया संघाची पॉईंट संख्या सहा आहे. ग्रुप बी पॉईंट टेबल नुसार मेन्स हॉकी च्या ओलंपिक मधून बाहेर जाणारी संघ आहेत अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड.

काय आहे पॉइंट टेबल ? Paris Olympics 2024 Men’s Hockey Point Group A

तसेच ग्रुप ए चा पॉइंट टेबल काही अशा प्रकारे आहे नेदरलँड हा ग्रुप ए संघात प्रथम स्थानावर आहे या संघाची पॉईंट संख्या सात आहे तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून आणि एक अनिर्णित सामना ठरवून नेदरलँड संघ पहिल्या स्थानावर आहे. तसेच जर्मनी दुसऱ्या स्थानावर ग्रेट ब्रिटन तिसऱ्या स्थानावर स्पेन चौथ्या स्थानावर साऊथ आफ्रिका पाचव्या स्थानावर आणि फ्रान्स हा शेवटच्या म्हणजेच सहाव्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. पहिले तीन संघ हे अंतिम सामन्याच्या दिशेने वाटचाल करतील.

चला जाणून घेऊया भारताने या ऑलम्पिक मध्ये कोण कोणत्या खेळात सहभाग नोंदवला आहे आणि भारताला कोणकोणत्या खेळांमध्ये पदके मिळाली आहे खालील प्रमाणे Paris Olympics 2024 मध्ये भारताची सिंधू ही आज चीनच्या बींग जिओशी आमने-सामने लढेल. सिंधू ही राऊंड ऑफ 16 च्या फेरीसाठी पात्र झाली आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

https://taajyabatmya.com/paris-olympics-manu-bhakar-bronze-medal-india/

Exit mobile version