Site icon ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पैसे आले खात्यात, रक्षाबंधनच्या आधीच बहिणीला मिळालं 1 Unexpected Gift!

Ladki Bahin Yojana : पैसे आले खात्यात, रक्षाबंधनच्या आधीच बहिणीला मिळालं gift.

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक महिलांना 15 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या बँक खात्यात योजने अंतर्गत दिले जाणारी रक्कम जमा झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यातील जवळपास 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचा वाटप झालेला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या आणि खेडेगावातील महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली असून महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही लाभार्थींना फायद्याची ठरेल असे वाटत आहे. यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून बँक खात्यात जमा झाले नसल्यामुळे बऱ्याच बहिणी नाराज दिसत आहे. परंतु यामागचे कारण असे आहे की ज्या बहिणींचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड ला लिंक नसल्यामुळे ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही.

आपलं बँक खातं हे आधार कार्ड ला लिंक आहे का हे तपासून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
https://uidai.gov.in/ हे संकेत स्थळ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच येत्या 17 तारखेपर्यंत सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. लाडकी पण योजनेअंतर्गत भरलेल्या फॉर्म हा राज्य सरकारच्या तपासणीनंतर पुढे प्रक्रियेला पाठवला जातो त्यानंतरच ह्या योजनेची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होते.

किती रुपये आले बँक खात्यात ?

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील लगभग 16 जिल्ह्यांना या योजनेचा लाभ घेता आला आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, जालना, बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी कोकण विभाग मराठवाडा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा अनेक भागातील महिलांना या योजनेमुळे त्यांच्या बँक खात्यात ३००० रुपयांची धनराशी जमा झाली आहे.

कोण कोणत्या बँक खात्यांन मध्ये पैसे आले ?

मुख्यमंत्री माजी लाडके बंधू योजना ( Ladki Bahin Yojana ) महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम बँक खात्यांमध्ये जमा झालेली आहे. 15 ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख महिलांना या रकमेच्या लाभ मिळाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार बहिणींच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना या योजनेसाठी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे त्याशिवाय या योजनेचे रक्कम आपल्या खात्यात जमा होणार नाही असे पोर्टलवर आणि वरच्या आदेशावरून जाहीर करण्यात आले आहे.

हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाला या योजनेमुळे लाभ होणार आहे महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळाला आहे. 200 रुपये मजुरीने दिवसाला कामाला जाणाऱ्या महिलांना या रकमेमुळे चेहऱ्यावर एकमेकाचा आनंद दिसून येत आहे.

बँक खात्यांची नावे खालील प्रमाणे:

  1. HDFC Bank
  2. Bank of Baroda
  3. Bank of Maharashtra
  4. State Bank of India
  5. Bank of India
  6. Central Bank of India
  7. IDFC bank
  8. District cooperative Bank limited

कुठल्याही बँक खात्याचा क्रमांक तुम्ही या योजनेसाठी जोडू शकता. कुठल्याही नॅशनलाईज बँक या योजनेसाठी ग्राह्य धरल्या जातील.

अग! लाडकी बहीण! काय करणार या पैशांचं?

नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी भागातील महिलेला विचारल्यावर तिने सांगितले की, “आज पर्यंत एक रक्कम कधीच माझ्या खात्यात शिल्लक राहिली नव्हती. पहिल्यांदा तीन हजार रुपये एक ठोक आल्याने, मी या रकमेचा चांगला वापर करणार आहे. मला माहिती आहे महागाईच्या ह्या जमान्यात तीन हजार रुपयात खूप काही येणार नाही, परंतु माझ्या महिन्याभराचा किराणा आणि मुलाबाळांना कापड घ्यायची इच्छा आहे.”

माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) नवीन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख!

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने चा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही आहे. बऱ्याच महिलांच्या फॉर्ममध्ये त्रुटी असल्याकारणाने त्यांना वारंवार नवीन फॉर्म भरावे लागत आहे. या योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) लागणारे डॉक्युमेंट्स आणि कागदपत्रे खालील प्रमाणे. खालील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या जवळच्या ई सेवा केंद्रात फॉर्म भरून मिळेल.

 

योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य महाराष्ट्र
वर्ष 2024
योजनेचा प्रारंभ दिनांक 1 जुलै 2024
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024
अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन
आर्थिक मदत रक्कम ₹ 1500 दर महिना
योजनेचे उद्दिष्ट राज्यातील महिला व मुलींना सशक्तिकरणास चालना देणे. तसेच महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Khatron Ke Khiladi Season 14 | गश्मीर महाजनी ठरला कालच्या स्टंट मधला खरा Super Shark..!

Exit mobile version