Hyundai Creta च्या तुम्ही प्रेमात पडालं!
Hyundai Creta N line: भारतात सर्वात जास्त विकली जाणारी ह्युंडाई क्रेटा 2024 मध्ये नव्या आकर्षक डिझाईन मध्ये ग्राहकांसाठी उतरली आहे. नवीन फेसलिफ्ट सह हेडलाईन्स फ्रंट कॅमेरा 360 डिग्री कॅमेरा आणि नवीन दमदार alloy wheels सह हुंडाई क्रेटा ने सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे.
Creta ही भारतात सर्वात जास्त विकली जाणारी कार!
सध्या भारतात ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये कमालीची उंची पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात नवनवीन डिझाईन्स आणि मॉडेल्स सह भरमसाठ फीचर्स असलेल्या बऱ्याच कार्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.
2024 मध्ये भारतात किती Creta विकल्या गेल्या?
जुलै 2024 मध्ये, Hyundai Creta ने तब्बल 17,350 कार्स ची शिपिंग करून आणि जून 2024 मध्ये तिसऱ्या स्थानावरून पुढे सरकत, सर्वोच्च स्थान मिळवले, जिथे तिने जवळपास 16,300 युनिट्सची विक्री केली. जुलै 2023 च्या तुलनेत, Creta च्या विक्रीत लक्षणीय 23 टक्के वाढ झाली. विक्रीच्या आकडेवारीमध्ये क्रेटा आणि क्रेटा एन लाइनचा समावेश आहे.
किती असेल Hyundai Creta चा मायलेज ?
Hyundai Creta N Line चा मायलेज 18 ते 18.2 kmpl आहे. ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 18.2 kmpl आहे. Creta मालकाने नोंदवलेले मायलेज 16.54 पासून सुरू होते आणि 20 kmpl पर्यंत जाते. Creta साठी Customer ने नोंदवलेले पेट्रोल मायलेज 16.54 kmpl – 17 kmpl आणि Hyundai Creta साठी Car Owner ने नोंदवलेले डिझेल मायलेज 16.75 kmpl – 20 kmpl दरम्यान आहे.
भारतात प्रत्येकजण क्रेटा का खरेदी करत आहे?
प्रभावी पॉवरट्रेन: ज्या वेळी प्रमुख स्पर्धक पेट्रोलचे पर्याय देत नव्हते, तेव्हा Hyundai ने 2015-2020 Hyundai Creta सोबत 1.6 पेट्रोल आणि डिझेल पर्यायासह टर्बोचार्ज केलेल्या 1.4 लिटर डिझेल युनिटची ऑफर दिली, ज्यामुळे Hyundai Creta ही त्याच्या वर्गातील एकमेव SUV बनली ज्याने विविध इंजिन पर्याय ऑफर केले.
क्रेटा वेगवान कार आहे का? किती आहे Top Speed?
Hyundai Creta 2024 एन लाइन हा नविन मॉडेल सध्या भारतीय बाजारात सर्वाधिक विकला जात आहे. Creta Standard मध्ये दिलेल्या 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन हेच ह्या नविन Hyundai Creta N line मध्ये बघायला मिळते.
Hyundai Creta N line Engine बद्दल सांगायचं म्हटल तर 158 bhp चा दमदार पॉवर आणि 258Nm torque generate करते. Hyundai Creta च्या Top Speed बद्दल सांगायचं झालं तर Hyundai Creta (0-100kmph) फक्त 8.9 सेकंदात गाठते.
कुठल्या कारची सर्वात जास्त डिमांड आहे? जाणून घेऊया…
1. Maruti Suzuki Brezza: मारुती सुझुकीची ब्रेझ्झा ही सध्या पहिल्या स्थानावर आहे गेल्या ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकी ब्रेझ्झा च्या तब्बल 19 हजार 190 गाड्यांची विक्री झाली आहे. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त मायलेज आणि परफॉर्मन्ससाठी सध्या ब्रेजा च नाव पहिल्या क्रमांकावर घेतल्या जात आहे. ब्रेजा ची किंमत 8.29 लाखापासून टॉप वेरियंटमध्ये 17 लाखापर्यंत उपलब्ध आहे. स्मार्ट हायब्रीड फीचरमुळे ब्रेजाचा मायलेज जवळपास 28 किलोमीटर प्रति लिटर एवढा आहे त्यामुळेच भारतातील ग्राहकांचे या गाडीसाठी खूप जास्त मागणी आहे.
2. Maruti Suzuki Ertiga: मारुती सुझुकी एर्टिगा ही सध्या दुसऱ्या स्थानावर आहे ऑगस्ट महिन्यात एर्टिगाच्या 18580 गाड्या ग्राहकांनी विकत घेतले आहेत. एर्टिगा ही सीएनजी व्हेरियंट मध्ये ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे. कमीत कमी किमतीत 7 सीटर एस यु व्ही टाईप मध्ये ही गाडी ग्राहकांच्या पसंतीची आहे.
Video credit: @FuelInjected
3. Hyundai Creta: ह्युंडाई क्रेटाला सध्या मारुती सुझुकीच्या दोन गाड्यांनी मागे टाकले आहे पहिल्या क्रमांकावर Brezza तर दुसऱ्या क्रमांकावर Ertiga बाजी मारली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये गुंडाई क्रेटाच्या तब्बल 16762 गाड्या विकल्या गेल्या आहेत. इंडिया क्रेटा ने नवीनच फेसलिफ्ट सह आधुनिक फीचर्स आणि बरेच अपडेट फीचर्स दिल्यामुळे सध्या क्रेटा ही सुद्धा ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे. Hyundai Creta च्या Base Model ची किंमत 9.50 लाखा पासून सुरू होते Top Model Diesel Automatic हा 22 लाखापर्यंत आहे. भन्नाट मायलेज देणारी Creta सध्या ग्राहकांच्या पसंती उतरत आहे. Creta ही एक क्रॉस ओव्हर suv आहे. 5 सीटर सहित आलिशान स्पेस देणारी Creta सध्या भारतात खूप जास्त प्रमाणात विकली जात आहे.
क्रेटा एन लाइन स्टँडर्ड क्रेटा मधील समान 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन वाहते. फोर-पॉट 158bhp आणि 258Nm टॉर्क बनवते, आणि N Line साठी मानक कारमधून अपरेट केलेले नाही. ते म्हणाले, हे आउटपुट भरपूर आहेत आणि एन लाइन द्रुत वाटते. Hyundai दावा करते की 0-100kmph वेळ 8.9 सेकंद आहे.
Rank | Car Model | Units Sold in August 2024 |
1 | Maruti Suzuki Brezza | 19,190 units |
2 | Maruti Suzuki Ertiga | 18,580 units |
3 | Hyundai Creta | 16,762 units |
4 | Maruti Suzuki WagonR | 16,450 units |
5 | Tata Punch | 15,642 units |
6 | Maruti Suzuki Swift | 12,844 units |
7 | Mahindra Scorpio | 12,723 units |
8 | Maruti Suzuki Baleno | 12,485 units |
9 | Maruti Suzuki Fronx | 12,387 units |
10 | Tata Nexon | 12,289 units |
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
MG Windsor ev vs Punch ev | MG समोर TATA झाली फेल! किंमत 9.9 लाख रूपये!!!
MG Windsor ev vs Punch ev | MG समोर TATA झाली फेल! किंमत 9.9 लाख रूपये!!!