3 मध्यम आकाराचे बटाटे 7 मिनिटांसाठी उकळून घ्या किंवा कुकरची 1 शिट्टी घेऊन गॅस बंद करून वाफ निघाल्यावर बटाटे सोलून त्यांचे लांब काप करून घ्या
लांब कापलेले बटाट्याची काप गार होण्याकरता 15 मिनिटं डीप फ्रिजरमध्ये ठेवा. हे काप तुम्ही महिनाभर सुद्धा मोठ्या प्रमाणात करून फ्रिजरमध्ये स्टोअर करू शकता. फ्रिजर मधील बटाट्याचे काप गरम तेलात लालसर होईपर्यंत तळून घ्या.
एका वाटीत 2 चमचे मध, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स करून थोडेसे पाणी टाकून मिश्रण एकत्र करून घ्या.
त्या मिश्रणामध्ये 1 चमचा तीळ घालावे.थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे शरीरासाठी फारच महत्त्वाचे आहे. तिळामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात.
एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापवून त्यात बारीक कापलेला लसूण आणि अद्रक घालून लालसर झाल्यावर त्यात बटाट्याचे काप घालावे.
चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घातल्यावर परतून घ्यावं. परतून झाल्यावर त्यात मधाचे मिश्रण घालून पुन्हा परतून गरमागरम सर्व्ह करावे.