Site icon ताज्या बातम्या

30 Day No Sugar Challenge | फक्त 30 दिवस साखर बंद करून तुम्ही दिसाल 10 वर्षांनी तरुण!!

30 Day No Sugar Challenge

30 Day No Sugar Challenge: साखरेचे दुष्परिणाम ज्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो!

30 Day No Sugar Challenge: आपण आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही खातो आणि जे काय पितो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये साखरेचे प्रमाण किती आहे हे आपल्याला माहित नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही प्रमाणात साखर ही नक्कीच असते. नैसर्गिक रित्या साखर असल्यावर त्या पदार्थाला किंवा त्या फळाला प्रक्रिया न करता खाल्ले तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. परंतु आपण पाहत असाल चहा कॉफी आणि दूध युक्त पदार्थ यांच्यात भरभरून साखर ओतली जाते. जास्त साखर खाल्ल्याने काय काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया.

  1. जर आपल्याला नेहमीच साखर आणि गोड खायची सवय असेल तर कालांतराने आपल्याला मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो.
  2. जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपले वजन झपाट्याने वाढते. त्याचबरोबर आपले वय हे आपल्या खऱ्या वयापेक्षा जास्त दिसू लागतील.
  3. अतिप्रमाणात साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या पचनशक्तीवर खूप जास्त दुष्परिणाम होतो. पोट साफ होण्यास आणि खाल्लेले अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर आपली पाचनशक्ती कमी होते.
  4. लहानपणापासूनच लहान मुलांना आपण चॉकलेट्स आईस्क्रीम आणि साखर युक्त पदार्थांची सवय लावतो म्हणूनच पुढे जाऊन आपल्याला गोड आणि अति गोड खाण्याची सवय लागते.
  5. लहानपणापासूनच जास्त साखर खाल्ल्यामुळे कॅल्शियम ची मात्रा शरीरात कमी होण्याचा लहान मुलांमध्ये निर्माण होतो ज्यामुळे लहान मुलांचे दात किडतात आणि शरीरात आणि पोटात वेगवेगळे आजार निर्माण होण्याचा धोका असतो.

आपण जर 30 दिवस पूर्णपणे साखर बंद केली तर काय होईल..??

30 Day No Sugar Challenge: आज काल आपल्याला सगळीच माहिती मोबाईल आणि इंटरनेट द्वारे आपल्यापर्यंत पोहोचते. साखर बंद केल्यानंतर त्याचे काय काय चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात याबद्दल तुम्हाला माहीतच असेल तरीसुद्धा आम्ही आणि आमच्या टीमने रिसर्च केलेल्या काही गोष्टी तुमच्या सोबत आम्ही शेअर करत आहोत. तुम्ही पाहिले असेल प्रत्येक स्पोर्ट पर्सन हा त्याच्या डायट बद्दल आणि रुटीन बद्दल जेव्हा केव्हा सांगत असतो किंवा आपल्या खाण्यापिण्याबद्दल उल्लेख करत असतो तेव्हा एक गोष्ट नेहमी आपल्या लक्षात येते की (30 Day No Sugar Challenge) ते लोक कधीच गोड आणि साखर युक्त पदार्थ खात नाहीत.

जॉन इब्राहिम ने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते त्याला गोड पदार्थ खाऊन 25 ते 30 वर्षे झाली आहेत. त्याच्या एका मुलाखतीत मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने त्याला काजू कतली खाण्यास सांगितले असताना (30 Day No Sugar Challenge) जॉन इब्राहिम या अभिनेत्याने त्याला सांगितले की मी माझी सगळ्यात जवळची वस्तू म्हणजे काजू कतली गेल्या पंचवीस वर्षापासून कायमची सोडली आहे आणि त्याचा मला आज किती फायदा झाला आहे त्याचं मलाच माहिती. शारीरिक आणि मानसिक विकास हा खूप जास्त प्रमाणात वाढतो याचे एकमेव उदाहरण म्हणजे साखर सोडल्यानंतर आपल्याला अनुभवात येते.

फक्त तीस दिवस साखर बंद केल्याने याचे काय परिणाम होतील याचा तुम्ही कधीच विचार करू शकणार नाही. (30 Day No Sugar Challenge) अविस्मरणीय आणि अद्भुत असे बदल आपल्याला साखर सोडल्याने मिळतात. जर तुम्ही सुद्धा तीस दिवसांसाठी साखर सोडू शकत असाल तर खालील दिलेली माहिती जरूर वाचा. तुम्ही नशा करणाऱ्या लोकांना पाहिलं असेल दारू पिणारे आणि वेगवेगळे पदार्थ वापरून नशा करणारे लोक ज्या पद्धतीने एका वेगळ्या धुंदीत असतात त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या शरीरात गेलेल्या द्रव्यामुळे त्यांचा मेंदू हा निष्क्रिय होतो.

त्याचप्रमाणे साखरेमुळे आपल्या मेंदूवर त्याचा खूप भयंकर परिणाम होतो. साखर ही आपल्या शरीरातील आनंदग्राही नसांना सक्रिय करते ज्यामुळे (30 Day No Sugar Challenge) आपला मेंदू वर भयंकर परिणाम करतो. साखर ही आपल्याला नशा युक्त पदार्थ नाही वाटत कारण ती पूर्णपणे नैसर्गिक आहे.

३० दिवस साखर बंद केल्याने तुमच्यात काय बदल होईल.. ?

30 Day No Sugar Challenge: साखर ही आपल्या दैनंदिन जीवनातला एक मुख्य घटक म्हणून आपण सध्या पाहत आहोत आणि त्याचा वापर करत आहोत. तुम्ही जर आज पासून 30 दिवस साखर सोडण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्ही एक अद्भुत आणि अविश्वसनीय गोष्टीकडे आपले पहिले पाऊल टाकत आहात यात शंका नाही. 30 दिवसानंतर आपल्याला जे बदल दिसतील ते तर अविश्वासनीय असतीलच परंतु ह्या (30 Day No Sugar Challenge) प्रवासात तुम्हाला अडचणीही तेवढ्याच येणार आहे. जसे की…

Video Credit: @okaymohit

Week 1: पहिल्या आठवड्यात जेव्हा तुम्ही साखर खाणं बंद कराल तेव्हा तुमची चिडचिड वाढण्याची शक्यता असू शकते. अचानक साखर बंद केल्याने आपल्या मेंदूला त्या गोष्टीबद्दल संकेत मिळतात कारण साखर ही सुद्धा एका नशा युक्त पदार्थ सारखीच काम करते. एखाद्या रोज नशा करणाऱ्या माणसाला अचानक तो पदार्थ न दिल्याने त्याला जी त्याची जी अवस्था होते त्याचप्रमाणे साखर बंद केल्याने आपल्याला चिडचिड होणे थकवा येणे मूड ऑफ असणे या गोष्टी दिसतील परंतु या गोष्टींवर तुम्ही मात केली तर तुम्ही यशस्वीपणे दुसऱ्या आठवड्यात प्रवेश कराल.

Week 2: दुसरा आठवडा हा पहिल्या आठवड्यापेक्षा थोडा कमी कठीण असेल परंतु ह्या आठवड्यात अजून एक तुमच्यासाठी आव्हान असेल ते म्हणजे तुम्हाला साखर खाण्याची इच्छा होईल थोडीशी साखर खाऊन बघतो काही होणार नाही थोडसं गोड पदार्थ खाऊन बघतो काही होणार नाही असे बरेच विचार आपल्या डोक्यात आणि मेंदूत येतात.

Week 3: त्या विचारांना पाठमोरा करत आपण आपल्या ध्येयावर निश्चित राहून तिसऱ्या आठवड्यात जर प्रवेश केला तर तिसरा आठवडा तुम्हाला तुमच्या एका वेगळ्या रूपाकडे आणि वेगळ्याच व्यक्तिमत्वाकडे घेऊन जाईल. तुम्ही ह्या आठवड्यापासून बंद केलेल्या साखर मुळे तुमच्या शरीरात झालेल्या बदलांना अनुभव आला आणि स्वतःलाच बघून आश्चर्यचकित व्हाल.

Week 4: नेमके काय काय बदल होतील ते जाणून घेऊया.

  1. तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
  2. तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलतो.
  3. तुमचा stamina वाढण्यास मदत होते.
  4. Metabolism वाढते.
  5. पचनक्रिया सुधरते.
  6. तुम्ही पूर्वी सारखे तरुण दिसू लागतात.
  7. तुमचा मेंदु अधिक कार्यक्षम बनतो.

कुठलेही पदार्थ खाण्याआधी, त्यात साखर तर नाही ना? हे जरूर तपासा..!

30 Day No Sugar Challenge: तुम्ही साखर खाणे बंद केले असले तरीसुद्धा बाहेरच्या गोष्टी ज्यांच्यामध्ये साखर किंवा साखर युक्त पदार्थ हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे बंद करायचे असतात. फळांमधून किंवा फळभाज्यांमधून मिळणारी साखर ही शरीरासाठी उपयुक्त असते. कोण कोणत्या गोष्टीत साखर आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर खालील दिलेल्या गोष्टींवर लक्ष असू द्या.

कुठल्याही पॅकेजिंग पदार्थाला खाण्याआधी त्या वस्तूवर किंवा पॅकेटवर दिलेल्या ingredients बद्दलच्या माहितीला वाचा. जर त्या वस्तूमध्ये पहिल्या पाच इन्ग्रेडियंट्स मध्ये साखर किंवा added शुगर असं लिहिलेले असेल तर तुम्ही ती वस्तू खाणे चुकीचे आहे. (30 Day No Sugar Challenge) काही लोक साखर बंद केली म्हणून गुळाचा वापर करतात परंतु गुळात सुद्धा काही प्रमाणात साखर असते म्हणून गुळाचा वापर करू नका. तीस दिवस पूर्णपणे साखर बंद म्हणजे कुठल्याही गोष्टीतून आपल्या शरीरात साखर जाणार नाही याची दक्षता आणि काळजी घेणे. दूध पीत असाल तर दुधामध्ये सुद्धा साखरचे प्रमाण असते परंतु नैसर्गिक दूध असेल तर त्याचा कुठलाही वाईट परिणाम होत नाही.

जर तुम्ही चहा घेण्याचे शौकीन असाल किंवा तुम्हाला चहा शिवाय अजिबात चालणार नसेल तर तुम्ही कोरा चहा बिना साखरेचा चहा घेऊ शकतात आणि जर तुम्हाला चहा सुद्धा बंद करायचा असेल तर तुम्ही ग्रीन टी लेमन टी याचा वापर करू शकतात.

साखरे ऐवजी मध खाणे कधीही चांगले असते. मध हा एक चांगला उपाय आहे (30 Day No Sugar Challenge) परंतु ते मध नैसर्गिक आणि ओरिजनल असले पाहिजे. बाजारात मिळणाऱ्या पॅकेजिंग डब्यांमध्ये मिळणारे मध हे पूर्णपणे नैसर्गिक नसते त्यात काही प्रमाणात साखर मिसळून त्याला तयार करण्यात आलेले असते म्हणून ते सुद्धा खाणे टाळावे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

10 kg Weight Loss in a Week | झटपट नाही तर आरामात वजन कमी करा..! Best Tips for Weight Loss..!

10 kg Weight Loss in a Week | झटपट नाही तर आरामात वजन कमी करा..! Best Tips for Weight Loss..!

 

Exit mobile version